जिल्ह्याच्या महसूल सीमेच्‍या हद्दीत आज मध्यरात्रीपासून प्रतिबंधात्‍मक आदेश जारी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्याच्या महसूल सीमेच्‍या हद्दीत आजपासून (दि. 15 सप्टेंबर) ते दि. 24 सप्‍टेंबर 2020 रोजीचे मध्यरात्रीपर्यंत प्रतिबंधात्‍मक आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार खालील बाबींना मनाई करण्यात आली आहे. यात, शस्त्रे, काठया, सोटे, तलवारी, भाले, सुरे, बंदुका, दंडे अगर लाठया किंवा शारिरीक इजा करणेसाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर नेणे.

दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे व साधणे जवळ बाळगणे किंवा तयार करणे किंवा जमा करणे.

कोणत्याही व्यक्तींच्या आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक जवळ बाळगणे किंवा तयार करणे. जाहीरपणे घोषणा.

देणे, गाणे म्हणणे, वादय वाजविणे, ध्वनिवर्धक किंवा ध्वनीक्षेपक वापरणे किंवा वाजवणे, शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य करणे वर्ज्य आहे.

तसेच भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणणे अगर तशी चित्रे, चिन्हे किंवा इतर क्स्तु तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे.

सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ तसेच अन्य कारणास्तव सभा घेणेस मिरवणूका काढणे आणि पाच पेक्षा जास्त व्यक्‍ती एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment