जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘त्या’ आदेशाने साखर कारखाने अडचणीत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- कोरोनाने देशभर धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण जास्त प्रमाणात आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

या वाढत्या आणि जास्त रुग्णसंख्येला ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी राज्याने महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कमी पडू नये यासाठी सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी त्या त्या जिल्ह्यात ऑक्सिजन सिलेंडर तयार करणार्‍या कारखान्याने उत्पादित केलेले

सर्व 100 टक्के सिलेंडर करोनासाठी राखीव केल्याने राज्यातील साखर कारखाने व इतर उद्योगांना सध्या वेल्डिंग व फॅब्रिकेशनची कामे करण्यासाठी ऑक्सिजन सिलेंडरची टंचाई भासत असल्याने उद्योग संकटात आले आहेत. ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध होत असल्याने

साखर कारखाने व इतर उद्योगांत सुरू असलेले कटींग, वेल्डिंग व फॅब्रिकेशनची कामे ठप्प झालेली आहेत. यासंदर्भात इंडियन शुगर मिल्स असोशिएशनने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना महाराष्ट्र राज्यातील साखर कारखान्यांना ऑक्सिजन सिलेंडरचा वापर व सुलभ पुरवठ्या संदर्भात पत्र लिहिले आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे की, ऊस गळीत हंगाम दि. 15 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. साखर कारखान्यांना गळीत हंगाम सुरु करण्यापुर्वी कारखान्याच्या दुरुस्तीचे व हंगामासाठी आवश्यक इतर तांत्रिक कामकाज पुर्ण करणे आवश्यक आहे.

कारखान्यांनी कळविल्याप्रमाणे बिगर हंगाम देखभाल व दुरुस्तीच्या कामकाजाकरीता त्यांना 8 किलोच्या प्रती दिन 20 ऑक्सिजन सिलेंडरची आवश्यकता लागणार असून, गळीत हंगाम सुरु झाल्यानंतर हंगामामध्ये 8 किलोच्या प्रती दिन 10 ऑक्सिजन सिलेंडरची आवश्यकता आहे .

त्यामुळे गळीत हंगामाच्या पूर्व तयारीसाठी व गळीत हंगाम सुरु झाल्यानंतर ऑक्सिजनचा पुरवठा कारखान्यांना होणे गरजेचे आहे. त्यानुसार राज्यातील सर्व साखर कारखान्यांना आवश्यकतेनुसार ऑक्सिजन सिलेंडरचा सुलभ पुरवठयाकरीता शासन स्तरावर योग्य ते आदेश निर्गमित व्हावेत असे पत्रात म्हटले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment