‘असा’ घडला राहुरी तालुक्यातील तो गोळीबाराचा थरार ! वाचा काय झाल आज पहाटे…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरा २५ वर्षीय तरुणीच्या घरात पहाटेच्या सुमारास घुसून ३० वर्षीय तरुणाने तरुणीस गोळी झाडून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला व स्वतः तर डोक्यात गोळी झाडून घेऊन आपली जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला.

परंतु सुदैवाने तरुणीच्या डोक्याला गोळी घासून गेल्याने ती किरकोळ जखम झाली असून तिची प्रकृती स्थिर आहे. तर गोळीबार करणारा  तरुण गंभीर जखमी असून लोणी येथे उपचार सुरू आहे.

आज मंगळवार पहाटे ५.४५ वाजता तरुणीच्या बंगल्याच्या मागील दरवाज्यातून विक्रम रमेश मुसमाडे याने व अन्य एक साथीदार यांनी प्रवेश केला.यावेळी स्वयंपाक गृहात तरुणी झाडलोट करत असताना विक्रम याने तिला तू माझ्यावर प्रेम का करत नाही असे विचारणा केली.

त्याचवेळी तरुणीची लहान बहीण तेथे आली असता विक्रमने तिलाही मारहाण केली. तरुणीने माझे तुझ्यावर प्रेम नाही, असे सांगताच विक्रम याने कंबरेला लावलेली बंदूक काढून तिच्या डोक्याला लावून तुला जीवे मारून टाकतो असे म्हणत असताना तरुणीच्या आजीने  विक्रम यास जोराचा धक्का दिला.

त्याच वेळी बंदुकीमधून गोळी सुटलेली होती.ती तरुणीच्या डोक्याला घासून गेली.जखमी अवस्थेत तिने आपल्या चुलत्यास मोबाईलवर संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

तो पर्यंत विक्रम मुसमाडे याने स्वतःच्या डोक्याला बंदूक लावून गोळी झाडली. त्यात तो गँभीर जखमी त्याला स्वयंपाक गृहात रक्ताचे थोरोळे साचले होते.बंदुकीच्या गोळीचा आवाज ऐकुन आसपास शेजारी राहणारे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

विक्रम मुसमाडे याच्या मित्रांना घटनेची माहिती समजताच त्यांनी तातडीने विक्रम  यास प्रवरा  ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे.

घटनास्थळी फॉरेन्सिक लँब पथकाबरोबरवदरम्यान घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख ,

सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल, सहायक फौजदार पोपट टिककल, पोलीस नाईक वाल्मिक पारधी, पोलीस कॉन्स्टेबल गणेश फाटक आदी भेट दिली. दरम्यान या घटनेमुळे देवळाली प्रवरात खळबळ उडाली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment