अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज आढळले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ८४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २८ हजार ५१२ इतकी झाली आहे. 

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.६७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २८ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३९०२ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १४,  संगमनेर ०१, राहाता ०१, नगर ग्रामीण ०२, कॅंटोन्मेंट ०१, राहुरी ०१ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ८४० रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा २५०, संगमनेर ६२, राहाता ६९, पाथर्डी ०५, नगर ग्रा ५६, श्रीरामपूर ७८, कॅन्टोन्मेंट१४, नेवासा ४०, श्रीगोंदा ३७, पारनेर २५, अकोले २७,  राहुरी ४२,

शेवगाव ४६, कोपरगाव २१,जामखेड ३२, कर्जत २८, मिलिटरी हॉस्पिटल ०८अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या: २८५१२
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:३९०२
  • मृत्यू:५२१
  • एकूण रूग्ण संख्या:३२९३५

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment