अहमदनगर ब्रेकिंग : मध्यरात्री झाले असे काही … नगरसेवक म्हणाले…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-अहमदनगर शहरातील सावेडी येथील वसंत टेकडी भागातील शिलाविहार अपार्टमेंट परिसरात पार्क केलेल्या दुचाकींना मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास आग लागली.

सदर गाड्या पेटविण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. आगीत १ दुचाकी भस्मसात तर ३ दुचाक्यांचे अंशतः नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले.

अग्निशमन दलाचे वाहन दाखल होईपर्यंत स्थानिक नागरिकांनी आग आटोक्यात आणली होती. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

मात्र, या ठिकाणी शॉर्टसर्किटची शक्यता कमी असून वाहने पेटविण्यात आल्याचा संशय माजी नगरसेवक निखील वारे यांनी व्यक्त केला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment