मोठी बातमी : सुजित झावरेंवर विनयभंग, खंडणीसह ‘हा’ गुन्हा दाखल !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- सरकारी कामात अडथळा तसेच फोनवर अश्‍लिल भाषेत संभाषण केल्याप्रकरणी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे यांच्याविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुरूवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. तहसिलदार ज्योती देवरे यांनी यासंदर्भात  फिर्याद दिली आहे.

कोरोनाची लागण झाल्यामुळे देवरे या सुपे येथील खासगी रूग्णालयात  उपचार घेत होत्या. मिळालेल्या माहीतीनुसार १४ ऑगस्ट रोजी रात्री ९.४८ वाजण्याच्या सुमारास सुजित झावरे यांनी त्यांना मोबाईलवरून फोन केला होता.

फोनवरून झावरे यांनी अश्‍लिल व खालच्या भाषेत संभाषण केले होते. झावरे यांच्या या कृतीमुळे दुखावलेल्या देवरे यांनी यासंदर्भात झावरे यांच्या आई सुप्रिया झावरे, तसेच खासदार सुजय विखे यांच्याकडे तक्रार केली होती.

विखे यांनी मध्यस्ती करून हा वाद मिटविला होता. त्यानंतर निवेदन स्विकारण्यावरूनही झावरे यांनी आक्रमक होत देवरे यांच्यावर तोंडसुख घेतले होते. त्यामुळे देवरे यांनी अनेकांनी मनधरणी करूनही गुन्हा दाखल करण्याचा निर्णय मागे घेतला नसल्याचे सांगण्यात येते.

तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसलेल्या तहसिलदार ज्योती देवरे यांना झावरे यांच्यासोबत झालेला वाद, त्यानंतर तक्रार करू नये यासाठी आलेला दबाव यामुळे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्रकृती बिघडली. रक्तदाब तसेच मधुमेहाचा त्रास झाला होता.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment