गांधींना चोप देणाऱ्याचे साहेब नेमके कोण? नगरकरांमध्ये चर्चा रंगल्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- नगर अर्बन बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांना आज अर्बन बँकेच्या कार्यालयातील आवारात मारहाण झाल्याची घटना घडली होती.

हि घटना आज दुपारच्या सुमारास घडली असल्याने दिवसभर या घटनेबाबत नगरकरांमध्ये तर्क वितर्क लावले जात होते. पोलिसांनी याप्रकरणी राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून आशुतोष लांडगे यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी कि, तू आमच्या गांधीसाहेबांविरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार देतो. ‘तू बँकेचे फार लफडे बाहेर काढतोस, आमच्या साहेबांना त्रास देतो,

‘ असे लांडगे म्हणाला असता राजेंद्र गांधी म्हणाले, ‘मी माझे बँकेचे काम करतो. मला माझे काम करू द्या’, असे त्यांना समजून सांगत असताना त्याचा त्यांना राग येऊन त्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली.

तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली तसेच त्यांनी जाता जाता, ‘तू आमच्या गांधी साहेबांविरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रारी देतो, हायकोर्टात जातो, तुझा काटा काढतो’, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर ‘आमचे गांधी साहेब’ म्हणजे माजी खासदार दिलीप गांधी आहेत की अन्य कोणी गांधी साहेब आहेत, याची चर्चा नगरमध्ये जोरात आहे.

दरम्यान, नगर अर्बन बँकेतील कर्जवाटपातील गैरप्रकार तसेच रिझर्व्ह बँकेने या बँकेला केलेल्या आर्थिक दंडाला जबाबदार असलेल्यांविरुद्ध पोलिस कारवाई करण्यासाठी माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्याकडून पाठपुरावा सुरू आहे.

बँकेचे वरिष्ठ अधिकारी हा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याने आपण हा गुन्हा दाखल करण्यास तयार असल्याचेही पत्र त्यांनी बँकेला दिले आहे, पण प्रशासकांकडून त्याला मान्यता मिळालेली नाही.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment