अहमदनगर शहरात लपलेले नगरसेवक बाहेर काढा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर शहरात जनता कर्फ्यु होणार कि नाही होणार याची जोरदार चर्चा सुरु असुन यात 20 टक्के जनतेला जनता कर्फ्यु व्हावा असे वाटते तर 80 टक्के जनतेला जनता कर्फ्यु नको असे वाटते.

त्यामुळे जास्तीत जास्त जनता हि जनता कर्फ्यु नको या या बाजुने कल आहे. लॉकडाऊन जनतेला हवा का नको असे कोणाला वाटते याचा सर्वे महाराष्ट्रात मनसे च्या माध्यमातुन करण्यात आला होता त्यामध्ये जनतेच्या मनात जनता कर्फ्यु, लॉकडाऊन नको असे समोर आले त्यामुळे मनसे जनते सोबत आहे.लॉकडाऊन नंतर आताच कुठेतरी गोरगरीब हातावरचे पोट असणारे लोक काम धंदा व्यवस्थीत सुरु असतांना,

व्यापारी लोकांचा व्यवसाय कुठेतरी सुरळीत होत असतांना जनता कर्फ्यु करने हे चुकीचे आहे. काही लोकप्रतिनिधी प्रसिध्दी साठी जनता कर्फ्यु ची मागणी करत आहेत 10 ते15 दिवसांचा जनता कर्फ्यु करताना प्रशासनाची साथ नसेल ट्र जनता कर्फ्यु ला काय अर्थ आहे. जनता कर्फ्यु करण्यापेक्षा प्रभागत निवडुन आलेले लपुन बसलेले नगरसेवक बाहेर काढुन माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियाना प्रमाणे माझा प्रभाग माझी जबाबदारी हे अभियान रबऊन घरोघरी जाऊन

जसे निवडणुकीत मतदारांना पैसे वाटले तसे आज प्रशासनाची मान्यता घेउन अॅटीजन टेस्ट प्रत्येक नागरीकांची करा व ते गरजेचे आहे. जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोहचने हे गरजेचे आहे त्यासाठी प्रभागाचा नगरसेवक हा महत्वाचा भाग आहे. त्याच बरोबर सर्व पक्षाचे कार्यकर्ते या मध्ये सहभागी होने गरजेचे असुन जनतेला कोरोना मुक्तीचे सर्व शासनाचे नियम पळण्यास जबरदस्त्ती करने गरजेचे आहे. जनता कर्फ्यु मुळे गोरगरिब,

कामगार,व्यापारी,रिक्षाचालक,हातगाडी वर वडापाव, पाव भाजी,विकणारे ,तसेच ईतर जनता आर्थिक संकटात येतात त्यामुळे मनसे या लोकांना जनतेला अशा आर्थिक संकटात घलणार नाही. सप्टेंबरमध्ये कर्ज हप्ता वसुलीला सर्व बँक व फायनान्स कंपनी यांच्याकडुन सुरवात झाली असुन येणारे कर्जाचे हप्ते, मागचे कर्जाचे हप्ते भरण्याचे जनते समोर पडलेले असुन सरकारच्या चुकिच्या धोरणांमुळे हजारो रुपये कर्ज हप्ते थकल्यामुळे दंडाला समोरे जावे लागले.

नाहक हा भुर्दंड सहन कर्जदरांना सहन करावा अजुनही लागत असतांना त्यांना अजुन आर्थिक संकटात लोटण्यपेक्षा त्यांना बाहेर काढणे गरजेचे आहे. त्या करीता आम्ही मनसे च्या वतीने हजारो लोकांचे लॉकडाऊन मध्ये झालेले फायनान्स कंपनी चे दंड माफ करुन घेतले. त्यामुळे जनतेला काय अडचणी येत आहेत.हे आम्हाला माहित आहे.आज जे लोकप्रतिनिधी जनता कर्फ्यु ची मागणी करत आहे तेच लोक खाजगी हाॅस्पिटल च्या वाढीव बिलांबाबत काहीही बोलत नाही

फक्त मनसे च्या माध्यमातुन आम्हीच आवाज उठवत आहोत. जिल्हा, तालुका सीमा बंद होणार नाहित वाहतुक चालुच राहणार असेल तर अश्या जनता कर्फ्यु चा उपयोग काय.असा सवाल मनसेच्या वतीने जनता कर्फ्यु ची मागणी करनारया लोकप्रतिनिधींना केला असुनजर कोरोना कोविड 19 अजार हद्दपर करायचा असेल तर प्रभाग निहाय्य स्वच्छता करने, कोरोना कोविड 19 रुग्णांच्या टेस्ट करुन उपचार करने गरजेचे आहे. तसेच सर्वानी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिसटनसिंग चे पालन करने गरजेचे आहे.

या करीता लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे व त्या करीता मनसेच्या वतीने या पुढिल काळात अनेक उपक्रम कोरोना कोविड 19 आजारचा प्रादुर्भाव रोखण्यकरीता राबविण्यात येणार आहे. त्यामुळे जनतेने सर्व मास्क, सॅनिटायझर, सोशल डिसटनसिंग चे नियम पाळावेत तसेच जर कोणिही जनता कर्फ्यु पुकारला तर त्यामध्ये जनतेने सहभागी होहू नये.असे अवाहन मनसेचे जिल्हा अध्यक्ष सचिन डफळ, गजेन्द्र राशिनकर अॅड अनिता दिगे, मनोज राऊत, विनोद काकडे, गणेश शिंदे, पोपट पाथरे, अमोल बोरुडे, तुषार हिरवे, अशोक दातरांगे, दिपक दांगट, गणेश मराठे आदिंसह यांनी केले. आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment