बिबट्याच्या हल्ल्यात एकजण जखमी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :- संगमनेर तालुक्यातील खळी येथील सूर्यभान उगलमुगले (५७) यांच्यावर मंगळवारी बिबट्याने हल्ला करून जखमी केले. झरेकाठी येथून किराणा घेऊन घराकडे दुचाकीवर जाताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला.

पायाला चावा घेऊन जखमी केले. सुदैवाने पिकअप आल्याने बिबट्याने धूम ठोकली. जखमी उगलमुगलेंना आश्वी खुर्दच्या प्राथमिक आरोग्य कंेद्रात दाखल करण्यात आले. या परिसरातील ही पाचवी घटना आहे.

वन विभागाने पिजंरा लावून बिबट्या जेरबंद करावा, अशी मागणी राजहंसचे संचालक राजेंद्र चकोर, काँग्रेसचे विभाग अध्यक्ष सतीश वाघमारे, तंटामुक्तीचे पांडुरंग वाघमारे, सुरेश नागरे, प्रा. बाळासाहेब वाघमारे आदींसह ग्रामस्थांनी केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment