ती पुन्हा आली.. आणि नागरिकांच्या तोंडाचे पाणीच पळाले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-   बिबट्याचे नाव जरी ऐकले तरी अनेकांना घाम फुटतो. मात्र जेव्हा बिबट्या खुद्द मानवी वस्तीतच राहायला लागतो तेव्हा नागरिकांची काय हाले होत असतील याची कल्पनाही आपण करू शकत नाही.

गेल्या काही दिवसांपूर्वी अकोले येथील महावितरण कार्यालयाच्या परिसरात बिबट्या मादी फिरत असल्याची घटना घडली होती. काही दिवसानंतर ती मादी तेथून निघून गेली होती.

मादीच्या जाण्यामुळे गावकऱयांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र अकोल्यामध्ये पुन्हा एकदा बिबट्या मादीचा वावर वीज केंद्रात सुरू झाला आहे.

यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मादीला पळून लावण्यासाठी ग्रामस्थांनी फटाके फोडले, मिरचीचा धूर केला, डफ वाजवले, स्पीकरची गाणे वाजवली, पण ती मादी काही गेली नाही.

आता तिच्या मागे दोन बछडे ही हिंडू फिरू लागले आहेत. जसी त्यांची रात्रपाळी असल्यासारखे सायंकाळी सात वाजले की हे मायलेकी वीजकेंद्राच्या गेटवर येऊन बसतात.

गेली दीड महिन्यापासून ही बिबट्या मादी या परिसरात ठान मांडून आहे. वनविभाग दुर्लक्ष्य करीत आहे, तर वीज कंपनी व कर्मचारी अस्वस्थ आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

 

Leave a Comment