कोरोना इफेक्ट! एसटीवर धान्य वाहण्याची वेळ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-  एस.टी. बस आता माल वाहतुक सेवेतही दाखल झाली असुन एसटी आता गोदामातून शासकीय धान्याची पोती भरून आता लालपरी जिल्ह्यातील शासकीय गोदामात धान्य घेवुन जाणार आहे.

‘लॉँकडाऊन काळात प्रवासी वाहतुक बंद असल्यामुळे एसटी महामंडळ तोट्यात आले. बस स्थानक ओस पडले, मग एसटी महामंडळाने वाहतूक सेवा एसटी महामंडळा मार्फत सुरू करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातही एसटी बसकडून माल वाहतुक सुरु करण्यात आला आहे. आता शासकीय गोदामातही लालपरी धावणार आहे.

बसचा वरील टप कापुन त्यावर ताडपत्री टाकण्यात आली असुन आतील भाग बाकडे काढून मोकळा करण्याल आला आहे. आता एफ सीआय गोदामात लालपरीत शासकीय गहू, तांदूळ भरला जात आहे.

जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यातील गोदामात आता बसमधून वाहतूक केली जाणार आहे. बसमधून शासकीय मालाची वाहतूक सुरु झाल्यामुळे होणाऱ्या गैरप्रकाराला निश्चितच आळा बसेल यात शंकाच नाही.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment