वाळूत खेळण्याचा मोह त्यांना आवरला नाही आणि दोन बालमैत्रिणींचा झाला मृत्यू !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- दोन बालमैत्रिणींचा नदीत बुडून मृत्यू झाला. पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील शुभांगी बाळासाहेब जाधव (वय ७) व प्रियंका बापू मिसाळ (वय ८) अशी त्यांची नावे आहेत.

ही घटना गुरूवारी सायंकाळी घडली. प्रियंका व शुभांगी देशमुख मळ्यात आळुची पाने, कोथिंबीर आणण्यासाठी गेल्या होत्या.

भाजी घेऊन वस्तीवरील लोकांनी त्यांना नदीच्या अलीकडील बाजूला आणून सोडले, पण वाळूत खेळण्याचा मोह त्यांना आवरला नाही. वाळूउपसा झालेल्या एका मोठ्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्या बुडाल्या.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment