युवक काँग्रेसची नवीन कार्यकरिणी जाहीर करणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-  युवकांना काँग्रेस पक्षात काम करण्याची चांगली संधी असून, नेतृत्व गुण असलेल्या युवकांना पक्षात संधी देण्यात येते.

ग्रामीण भागातून आलेला युवक देखील या पक्षात आपले कर्तृत्व सिध्द करु शकतो. पक्षातील कार्यकर्त्यांनी काम करत रहावे त्यांच्या कार्याचा निश्‍चित दखल घेऊन त्यांचा सन्मान होणार आहे.

प्रत्येक युवा कार्यकर्त्यावर इंडियन युथ काँग्रेसचे लक्ष असून, लवकरच युवकची नवीन कार्यकारणी जाहीर केली जाणार असल्याचे सूतोवाच युवक काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र निरीक्षक प्रियंका सानप यांनी केले.

तसेच यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले की, युवकांना काँग्रेस मध्ये संघटन कौशल्य व नेतृत्व गुण असलेल्या युवकांना संधी दिली जाणार आहे.

पदाधिकार्‍यांची निवड त्यांच्या क्षमतेनुसार होणार असून, यामध्ये कोणाचीही शिफारस चालणार नाही. काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव प्रशांत ओगले, अहमदनगर निरीक्षक अकील पटेल, जिल्हाध्यक्ष सोमेश्‍वर दिवटे, जिल्हाध्यक्ष निखिल पापडेजा, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, युवक शहर जिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे आदी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment