रुग्णालयाचे कर्मचारीच निघाले कोरोनाबाधित, तहसीलदारांनी केल ‘हे’ काम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- श्रीरामपुरातील एका रुग्णालयातील काही कर्मचारी कोरोना बाधीत निघाले. कोरोना योद्धे सक्षम रहावेत म्हणून प्रशासनाने व आरोग्य विभागाने उपचारासाठी कार्यवाहीही केली. 

एका महिला कर्मचाऱ्याची प्रकृती थोडी चिंताजनक वाटली, डॉक्टरांनी एका इंजेक्शनची गरज भासू शकते असे सांगीतले. मात्र दवाखान्यात हे इंजेक्शन उपलब्ध नव्हते.बाहेरुन आणण्याचा निर्णय झाला.

परंतू तेही मिळेना शेवटी प्रांताधिकारी व तहसीलदारांनी प्रयत्न केले. अखेर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी स्वतः ३२ हजार ४०० रुपये दिले अन् इंजेक्शन उपलब्ध करून देऊन माणुसकी जपली आहे.

शनिवारी श्रीरामपुरातील रुग्णालयात कार्य करणार्‍या काही कर्मचार्‍यांना किरकोळ त्रास वाटू लागल्याने त्यांची ग्रामिण रुग्णालयामार्फत अँटीजन रॅपीड टेस्ट करण्यात आली.

त्यातील काही कर्मचारी कोरोना बाधित निघाल्याने कोरोना योद्धयांची चिंता वाढली आहे. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी या योद्धयांचे योगदान महत्वाचे ठरत असल्याने त्यांना तातडीने उपचार मिळण्याकामी प्रांताधिकारी अनिल पवार,तहसीलदार प्रशशंत पाटील,डॉ.वसंत जमधडे यांनी तात्काळ सुविधा उपलब्ध करुन दिल्या.

त्यांचेवर कोरोना उपचार केंद्रात उपचार सुरु करण्यात आले.मात्र त्यापैकी एका महीला कर्मचार्‍याला थोडे अस्वस्थ वाटू लागल्याने एका इंजेक्शनची गरज भासू शकते असे सांगीतले.

मात्र ज्या रुग्णालयात हे कर्मचारी काम करतात तेथेही उपलब्ध नव्हते. श्रीरामपुरातही ते लवकर मिळेना.कोरोनाच्या काळात रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍या प्रत्येक कोरोना योद्धयाची गरज आहे.

त्यांची प्रकृती ठणठणीत असणे महत्वाचे आहे. या भावनेतून प्रांताधिकारी पवार व तहसीलदार पाटील यांनी महसुलचे कर्मचारी पाठवून ते उपलब्ध केले तर. एवढेच नाही तर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी स्वतः त्याची किमंत ३२ हजार ४०० रुपये स्वतः चुकते केले. तसेच आश्वस्तही केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment