अन त्याने घातला डोक्‍यात विळा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- भांडणात मध्यस्थी केल्याच्या कारणावरून एकाच्या डोक्‍यात विळा मारून जखमी केल्याची घटना पारनेर तालुक्यातील वसुंदे गावात घडली आहे.

या मारहाणीत पांडुरंग माधव झावरे हे जखमी झाले आहेत, या प्रकरणी भास्कर जनार्दन दाते त्याच्या विरोधात पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित आरोपी घटनेनंतर पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. याबाबत सविस्तर असे की फिर्यादी बस स्टॅन्डवर चहा पिण्यासाठी गेला असता

आरोपी दाते हा तेथे आला व तू सकाळी आमच्या भांडणात मध्यस्थी का केली तसेच तू माझ्या बहिणीला शिव्या का दिल्या , असे म्हणत त्याने त्याच्या हातातील विळा फिर्यादी झावरे यांच्या डोक्यात मारला. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून

शिवीगाळ केली व परत जर आमच्या भांडणाच्यामध्ये पडला तर तुझा काटा काढू अशी धमकी दिली. याबाबत अधिक तपास पोहेकॉ शेख हे करत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment