पर्यटकांसाठी खुशखबर ताजमहाल पुन्हा खुला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- आग्रा येथील ताजमहाल आजपासून पर्यटकांसाठी खुला केला आहे. मात्र ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.

दरम्यान मार्च 2020 मध्ये ज्यावेळेस देशातल सुरुवातीला कोरोनाचे रुग्ण वाढत होते त्यावेळेस सरकारने देशातील मोठी मंदिरे, पर्यटन स्थळे आणि गर्दी होणारे सर्व ठिकाणं बंद केली होती.

पण आता अनलॉक 4 अंतर्गत आजपासून आग्रा किल्ला आणि ताजमहल पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. पर्यटकांना प्रवेश करताना मास्क, सोशल डिस्टेंसिंगच्या अन्य नियमांचे पालन करावे लागणार आहे.

कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने 17 मार्चपासून ताजमहाल बंद ठेवले होते. आता आजपासून (21 सप्टेंबर) ताजमहाल पुन्हा पर्यटकांसाठी उघडला आहे.

येथे येणाऱ्या पर्यटकांना संसर्गाचा धोका निर्माण होऊ नये म्हणून नवीन व्यवस्था बनविली आहे. या व्यवस्थेंतर्गत ताजमहालमध्ये एकादिवसात केवळ पाच हजार पर्यटकांनाच प्रवेश दिला जाणार आहे.

यासाठी पर्यटकांच्या दोन शिफ्ट केल्या असून पहिल्या शिफ्टमध्ये 2500 आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये 2500 जणांना ताजमहाल पाहता येईल.

ताजमहालमध्ये प्रवेश करण्यासाठी पर्यटकांना ऑनलाईन तिकीट बुक करावे लागणार आहे. तिकीट खिडक्या बंद असतील. पार्किंगसह सर्व पैसे डिजिटल पद्धतीने द्यावे लागणार आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment