पाच हजार रुपयांसाठी डोक्यात दगड घालून एकाची हत्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-  ऊस तोडणीसाठी इसार म्हणून दिलेल्या पाच हजार रुपयांच्या मागणीवरून बीड जिल्ह्यातील पिंपळवंडी (ता.पाटोदा) येथील युवक मारुती (बाळु) निवृती पवार यांच्या डोक्यात दगड घालून खून झाल्याची घटना घडली आहे.

गंगाधर निवृती पवार यांच्या फिर्यादीवरून अंमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीने म्हंटले आहे कि, माझा भाऊ मारुती निवृती पवार (वय 40) यास मुकादम दादा शहादेव धनवडे (वय 36) याने 17 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 9 वाजता स्वतः सोबत नेले.

त्यानंतर मयत मारुती पुढील दोन दिवस घरी परतलाच नाही. दरम्यान डोंगरकिन्ही परिसरात कुणीतरी दगड डोक्यात मारून खून केलेले एक पुरुष जातीचे प्रेत सापडले त्याप्रमाणे प्रेत पाहिल्यानंतर ते प्रेत मारुतीचेच असल्याची खात्री पटली.

त्यावरून मारुती यास दादा शहादेव धनवडे हा ऊसतोडणीसाठी ईसार म्हणून दिलेले पाच हजार रुपये सतत मागत असायचा.

त्याच कारणावरून मारुती याला दादा शहादेव धनवडे याने डोक्यात मारून त्याचा जीव घेऊन त्याचा खून केला आहे अशी फिर्याद दिली. अमळनेर पोलिस ठाण्यात मुकादम दादा शहादेव धनवडे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment