मराठा आरक्षणाची पहिली ठिणगी पडली; ‘हा’जिल्हा आज बंद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- मराठा आरक्षणाच्या कायद्याला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे. विरोधकांनी राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवला आहे. परंतु या सर्व घडामोडींमुळे मराठा समाज अस्वस्थ झाला आहे.

या पार्श्वभूमीवर आंदोलनाची आज पहिली ठिणगी सोलापूर जिल्ह्यात पडली. मराठा क्रांती मोर्चाने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत राज्यभर आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातली आंदोलनाची पहिली ठिणगी माढ्यात पडली आहे. माढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज पहाटे साडेपाच वाजताच टायर पेटवून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.

सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज सोलापूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतरचा मराठा संघटनांनी पुकारलेला राज्यातील हा पहिलाच बंद असणार आहे. त्यामुळे सोलापूर शहर आणि जिल्हा पोलीस दलाने जिल्हाभरात कडक पोलीस बंदोबस्त लावला आहे.

दरम्यान, आज अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा समाज आंदोलन करणार आहे. आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर आज बारावा दिवस आहे.

सकल मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांकडून आंदोलन न करण्याबाबत पोलीसांकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. पण तरीदेखील आंदोलन करण्यावर आंदोलक ठाम आहेत.

दरम्यान पाठीमागे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या विषयावर सरकारची सविस्तर भूमिका मांडत मराठा समाजाला संयम राखण्याचं आवाहन केलं होत.

आरक्षण मिळण्याआधी समाजाला दिलासा देण्यासाठी काय करता येईल यावर विचार सुरू आहे. त्यामुळं कृपया मोर्चे व आंदोलने करू नका. कोरोनाचं संकट असताना अशा आंदोलनाची खरंच गरज नाही,’ असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं होत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment