अहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला 37000 चा आकडा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ९३३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ३८१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.४६ टक्के इतके झाले आहे. 

दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ५७ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३३१६ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २८, पाथर्डी १०, नगर ग्रामीण ०१, श्रीगोंदा १२, पारनेर ०३, कोपरगाव ०१ आणि इतर जिल्हा ०२ अशा  रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ९३३ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये  मनपा २५०, संगमनेर ५५, राहाता ८७, पाथर्डी ३५, नगर ग्रा. २९, श्रीरामपूर ९६, 

कॅन्टोन्मेंट ०६, नेवासा ४७, श्रीगोंदा २८, पारनेर ५४, अकोले ३६, राहुरी ३६, शेवगाव ४१, कोपरगाव ४७, जामखेड ४४,कर्जत ३३ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०९ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या: ३३३८१
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:३३१६
  • मृत्यू:६१९
  • एकूण रूग्ण संख्या:३७३१६

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment