तो तरुण कठड्यावर चढला आणि मारली नदीत उडी…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणे, तलाव भरली आहे. मुळा धरणातून नदीत 12 हजार क्‍यूसेकने पाणी सोडले आहे.

त्यामुळे नदी दुथडी भरून वाहते आहे. दरम्यान आज नगर-मनमाड महामार्गावरील पुलावर एक अज्ञात तरुणाने आज मुळा नदीत उडी मारत आत्महत्या केली.

दरम्यान याबाबत समजलेली सविस्तर माहिती अशी कि, नगर-मनमाड महामार्गावरील पुलावर आज सकाळी अज्ञात तरुण आला. हा तरुण 15-20 मिनिटे पुलाजवळ फिरत होता.

अचानक त्या तरुणाने पुलाच्या कठड्याजवळ उभा राहून कपडे काढले. टी-शर्ट व पॅंट कठड्यावर ठेवली. बॅग व चप्पल तेथेच ठेवली.

मग कठड्यावर चढून त्याने नदीत उडी मारल्याचे जुन्या पडक्‍या पुलाजवळ पोहणाऱ्या तरुणांनी पोलिसांना सांगितले. काही तरुणांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र 50 फुटांपर्यंत गटांगळ्या खात जाऊन तो पुढे दिसेनासा झाला.

पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शोधकार्य सुरू केले. मात्र, पाण्याचा प्रवाह वेगाने असल्याने शोध लागला नाही.

त्याच्या पिशवीतही ओळखीचा पुरावा आढळला नाही. दरम्यान घटनास्थळी तहसीलदार फसियोद्दीन शेख, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, तलाठी अभिजित क्षीरसागर यांनी धाव घेतली. तसेच पुढील तपास सुरु आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment