श्रीरामपुरात मोठे कोविड सेंटर उभे करू, परंतु त्यासाठी…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला.

त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे उपचाराला मर्यादा येत आहेत.

त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागररिकानी 13 ते 20 सप्टेंबर दरम्यान लॉकडाऊनचा जसा निर्णय घेतला आणि त्याला शहरातील सर्व व्यापार्‍यांनी पाठिंबा दिला.

त्याचप्रमाणे सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास श्रीरामपुरात मोठे कोव्हिड सेंटर आपण उभारू शकतो, असा विश्वास नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी व्यक्त केला आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी वरील प्रतिपादन केले आहे.

यात पुढे ते म्हणाले की, वाढत्या रुग्णसंख्येमुळे उपचारासाठी हॉस्पिटल मिळणे अवघड झाले आहे. त्यासाठी श्रीरामपूर शहरात सुसज्ज असे कोव्हिड सेंटर व्हावे यासाठी मी प्रयत्नशील आहे.

मात्र त्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. फक्त सूचना केल्या म्हणजे आपले काम संपले, असे न करता सर्वांनी मिळून जबाबदारी घेतली तर शहरवासियांसाठी मोठे सुसज्ज कोव्हिड सेंटर सर्वांच्या मदतीने आपण उभारू शकतो, असेही त्या म्हणाल्या.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment