महामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-नगर शहरासह जिल्ह्यातील खड्डे व नादुरुस्त रस्ते सध्या चांगलेच गाजले आहे. याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर चिखलफेक करण्यात मग्न आहेत. यामुळे रस्त्यांची अवस्था हि जैशी तिचं आहे.

दरम्यान आता नगर – मनमाड या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे, रस्त्याची झालेली चाळण पाहून माजी खासदार प्रसाद तनपुरे व्यथित झाले.

त्यांनी थेट केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदन देऊन त्यांना रस्ता दुरुस्तीबाबत साकडे घातले. नगर-मनमाड राज्यमार्ग क्र.४९ केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग क्र. १६० म्हणून घोषित केला आहे.

दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा सर्वात जवळचा रस्ता आहे. त्यामुळे, या रस्त्यावरून अवजड वाहनांसह प्रचंड वाहतूक आहे. वीस वर्षापूर्वी चौपदरीकरण केलेल्या डांबरी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.

राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे रस्ता हस्तांतरित करून, सिमेंट कॉंक्रीटचा मजबूत रस्ता व्हावा. अशी मागणी तनपुरे यांनी मंत्री गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे केली.

दरम्यान, या महामार्गावर दरवर्षी अनेक अपघात होतात. विशेषतः नगरची औद्योगिक वसाहत ते राहुरी दरम्यानचा रस्ता कायम खड्डेमय असतो.

देहरे गावादरम्यान काही भागात दरवर्षी खड्डेच खड्डे असतात. रेल्वे पुलाच्या जवळील रस्ता कायम उखडलेला असतो. तेथे अपघातांची मालिकाच सुरू असते. त्यामुळे हा रस्ता दुरूस्त व्हावा, अशी कायम मागणी होत असते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment