‘ह्या’ तालुक्यातील तब्बल 27 कैदी कोरोना पॉझिटिव्ह !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- कर्जत तालुक्यात उपकारागृहात असलेल्या ४८ कैद्यापैकी २७ कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची तहसीदार नानासाहेब आगळे यांनी दिली असून, तालुक्यात ११६५ लोक आत्ता पर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

कर्जत येथे उपकारागृहामध्ये एकूण ४८ आरोपी आहेत, यामध्ये४७ पुरुष एक महिला असून, यापैकी न्यायालयीन कोठडीत ४२ आरोपी आहेत तर सहा आरोपी पोलिस कस्टडीत आहेत.

आज या सर्व आरोपींची कोरोनाची अँटीजेन टेस्ट करण्यात आली यामध्ये २७ आरोपी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले असून, याबाबत तहसीलदार यांना अहवाल पाठविला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली.

कर्जत येथील उप कारागृहामध्ये चार बराकी असून , यापैकी एका बराकीत एक महिला आरोपी आहे तर एका बराकीमध्ये उपविभागीय अधिकारी व पोलिसांवर हल्ला करणारा माथेफिरू आरोपी आहे.

त्यामुळे उर्वरित दोन बराकीतच सर्व आरोपी होते. कर्जत येथील कोठडीत कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असल्याचे समजतात कर्जत नगरपंचायतीने या सर्व परिसरात जंतूनाशक फवारणी करण्यात आली, यावेळी मुख्याधिकारी गोविंद जाधव यांचे सह नगरपंचायतचे कर्मचारी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment