बँक अकाऊंटमधून पैसे चोरीला गेल्यास करा ‘हे’ , मिळतील सारे पैसे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- कोरोना महामारी काळात फसवणुकीच्या अनेक घटनात घडत आहेत. आरबीआय लोकांना यापासून वाचण्यासाठी वारंवार सूचना देत आहे. जर तुमच्या खात्यातून पैसे चोरीला गेल्यास तुम्ही काय करायला हवे, याबाबतची माहिती आरबीआयने दिली आहे.

आरबीआयनुसार, जर बँक खात्यातून पैसे काढले गेले असतील अथवा फसवणूक झाल्यास तीन दिवसांच्या आत याबाबत बँकेला सुचना द्यावी. बँकेला याची माहिती देणे अनिवार्य आहे. जर असे केल्यास याप्रकरणात तुमची झिरो लायबिलिटी असेल. जर असा व्यवहार अथवा फसवणूक तुमच्या चुकीमुळे झाले नसल्यास बँक तुम्हाला नुकसान भरपाई देईल.

आरबीआईने काय सांगितले :- 3 दिवसात फसवणूकीची माहिती द्या – रिझर्व्ह बँकेच्या सर्क्युलरनुसार, जर तुमच्या बँक खात्यातून अनधिकृत व्यवहार किंवा फसवणूक झाली असेल तर, तीन दिवसांत कोणत्याही प्रकारे बँकेला कळवा. याबाबत बँकेला माहिती देणे बंधनकारक आहे.

आपण हे केल्यास आपली या प्रकरणात झिरो लायबिलिटी असेल. जर आपल्या चुकीमुळे किंवा दुर्लक्षामुळे अनधिकृत व्यवहार किंवा फसवणूक झाली नसेल तर बँक झालेल्या नुकसानाची संपूर्ण भरपाई करेल.

आपण 3 दिवसानंतर माहिती दिली तर काय होईल? :- जर तुमच्या खात्यात अनधिकृत व्यवहार किंवा फसवणूक झाली असेल आणि तुम्ही याची माहिती बँकेला 4 ते 7 दिवसांच्या दरम्यान दिली असेल तर या प्रकरणात तुमची लिमि‍टेड लायबिलिटी असेल. म्हणजेच, अनधिकृत व्यवहाराच्या मूल्यांचा काही भाग आपल्याला सहन करावा लागतो.

बँक आपल्याला पैसे का देईल ? :- अशा फसवणूकीसाठी बँक पैसे का देईल असा आपल्याला प्रश्न पडला असेल. खरं तर अशा सायबर क्राइम आणि फसवणूकीसाठी बँका विमा पॉलिसी खरेदी करतात.जर आपल्याशी फसवणूक झाली असेल तर बँक त्याबद्दल विमा कंपनीला सूचित करेल.

विमा कंपनीकडून पैसे मिळतील, जेणेकरून ते पैसे परत  करेल. अशा प्रकारच्या फसवणूकीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी विमा कंपन्या  देखील संरक्षण  देतात. म्हणजेच तुम्ही  यासाठी विमा कंपन्यांकडूनही  पॉलिसी घेऊ शकता.

नुकसान टाळण्यासाठी विमा करा :- विशेष म्हणजे, आता सायबर फसवणुकीचे नुकसान टाळण्यासाठी विमा देखील केला जाऊ शकतो. अशा काही कंपन्या आहेत ज्या सायबर फसवणूकीसाठी विमा पॉलिसी देतात.

या कंपन्यांमध्ये बजाज एलियांज आणि एचडीएफसी एर्गोचा समावेश आहे. म्हणजेच, सायबर फसवणूकीच्या माध्यमातून जर तुमच्या खात्यातून पैसे गायब झाले तर विमा पॉलिसीअंतर्गत तुम्हाला संपूर्ण पैसे परत मिळू शकतात.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment