कोरोनाला हरवण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-  ही मोहीम सर्व नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी आहे. कोणताही नागरिक केवळ दुर्लक्षामुळे उपचारापासून वंचित राहणार नाही याची काळजी कुटुंबातील प्रत्येक सदस्याने घ्यावी.

कोरोनाला हरवण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या “माझे कुटुंब-माझी जबाबदारी” मोहिमेस स्नेहबंध फाउंडेशनने ही या मोहिमेत घरोघरी जाऊन सर्वेक्षणाद्वारे प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य विषयक तपासणी केली.

त्यावेळी शिंदे बोलत होते. शिंदे म्हणाले, कोरोना हे मानवतेवर आलेले संकट आहे. या लढाईत लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांनी स्वतःहून सहकार्य करावे.

जे नागरिक आजारी असतील किंवा त्यांना लक्षणे जाणवत असतील, त्यांना तत्काळ जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करा. कोणताही आजार अंगावर काढू नका.

या संसर्गाची साखळी सर्वांनी मिळून तोडू, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. असेही शिंदे म्हणाले. यावेळी हेमंत ढाकेफळकर, सर्जेराव तोडमल आदी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment