ढोल वाजवत ते बसले आंदोलनला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- राज्यात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्याने पेट घेतला आहे.

मराठा आरक्षणापाठोपाठ धनगर समाजही आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाला आहे. धनगर समाज अनुसूचित जमातीच्या (एस.टी.) आरक्षणाच्या अंमल बजावणीसाठी संघर्ष करत आहे.

याच पार्श्वभूमीवर धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी सरकारला जागे करण्यासाठी आज दुपारी पाथर्डीच्या तहसील कार्यालयासमोर ढोल वाजवत धरणे आंदोलन करून तहसीलदार नामदेव पाटील ,

पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे कि,महाराष्ट्र सरकारने विधानसभा व विधान परिषदेमध्ये ठराव करुन धनगर व धनगड हे एकच आहेत.

पदोन्नतीस पात्र कर्मचा-यांना पदोन्नती देण्यात यावी. पोलीस मेगा भरती व अन्य शासकीय भरती तातडीने करण्यात यावी. धनगर समाजाच्या उन्नतीसाठी मागील सरकारने सुरु केलेल्या

22 आदिवासी सदृष्य धनगर योजनांची तातडीने अंमलबजावणी करावी. तात्कालिन शासनाने तरतुद केलेले एक हजार कोटी रुपये तातडीने खर्च करण्यात यावेत.धनगर समाजाची जनगणना करुन लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दयावे.

यांसह अनेक मागण्यांसंबंधीचे निवदेन देण्यात आले आहे. या आंदोलनाला सर्वसामान्य नागरिकांसह अनेक समाज बांधव उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment