कर्जात बुडालेल्या अंबानीने विकले दागिने

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- कधीकाळी देशातल्या अग्रगण्या उद्योगपतींमध्ये ज्यांची गणना केली जात होती, त्या अनिल अंबानी यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली असून ते पूर्णत: कर्जबाजारी झाले आहेत.

कर्जत बुडालेल्या उद्योपती अनिल अंबानी यांना आता त्यांच्याविरुद्धचे कायदेशीर खटले लढणेही अवघड होऊन बसले आहे. हे खटले लढवण्यासाठी अनिल अंबानी यांना आपल्या घरातील सर्व दागिने विकून टाकावे लागले.

चिनी बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकवल्याप्रकरणी सध्या लंडन येथील न्यायालयात अनिल अंबानी यांच्यावर खटला सुरु आहे. अंबानी यांनी चीनमधील तीन बँकांकडून जवळपास 5 हजार 281 कोटी रूपये कर्ज घेतल आहे.

त्याची वसुली करण्यासाठी या बँकांनी लंडनमधील न्यायालयात अंबानी यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. या बँकांनी कर्जाच्या वसुलीसाठी अनिल अंबानी यांची मालमत्ता जप्त करण्याची परवानगी मागितली आहे.

चिनी बँकांनी अनिल अंबानी यांच्याकडे थकीत कर्जाच्या पैशासाठी तगादा लावला आहे. अनिल अंबानी यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या असल्याचे या बँकाचे म्हणणे आहे.

यासंदर्भात अंबानी म्हणाले कि, मी सध्याच्या घडीला अत्यंत साधे जीवन जगत असून धूम्रपान आणि मद्यसेवनही सोडले आहे.

मी एक सर्व सामान्य आयुष्य जगतं असून, माझा सर्व खर्च माझी पत्नी टीना अंबानी करतं असल्याची माहिती स्वत: अनिल अंबानी यांनी लंडनमधील उच्च न्यायालयाला दिली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment