आता या कारागृहातील कैदी आढळले कोरोनाबाधित

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कारागृहातील कैद्यांना कोरोनाची बाधा झाली होती. एवढेच नाहीतर तेथील पोलीस कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला होता.

आता कर्जत तालुक्यातील कारागृहातील कैदी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. कर्जत तालुक्यात न्यायालयीन कस्टडीत व पोलीस कस्टडीत असलेल्या 49 कैद्यांपैकी 28 कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची

माहिती पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली आहे. कर्जत येथे उपकारागृहामध्ये एकूण 49 ब़ंदिवान आहेत. यामध्ये 48 पुरुष एक महिला असून यापैकी न्यायालयीन कोठडीत 42 आरोपी आहेत.

तर सात आरोपी पोलिस कस्टडीत आहेत. आज या सर्व आरोपींची कोरोनाची अँटीजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये 28 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले.

याबाबत तहसीलदारांना अहवाल पाठविला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली असून पुढील आदेशाप्रमाणे या बंदिवानांना कोठे ठेवायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे.

कर्जत येथील कोठडीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असल्याचे समजताच कर्जत नगरपंचायतीने हा सर्व परिसर औषध फवारणी करून जंतूनाशक करण्यात आला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment