पूर्ण भारतातील शेतकऱ्यांचे दिवस बदलणार आहेत. मात्र…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-मराठा आरक्षणासाठी शरद पवार अजून आक्रमक झालेले नाहीत. आरक्षण मिळण्यासाठी त्यांनी अन्नत्याग का केला नाही, असा सवाल माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी करत पवारांचे अन्नत्याग म्हणजे खोटं रडणं आहे, असा टोला लगावला.

नगर येथे शहर भाजपच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वृक्षारोपण व अभिवादन कार्यक्रमात तावडे बोलत होते.

संघाचे पश्चिम महाराष्ट्र संघाचे प्रमुख नानासाहेब जाधव, माजी मंत्री राम शिंदे, माजी खासदार दिलीप गांधी, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, माजी आमदार चंद्रशेखर कदम, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे,

माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, संपर्कप्रमुख मनोज पानगावकर, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे आदी यावेळी उपस्थित होते. मंत्री तावडे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना उद्योजक करण्याकरिता नवीन तीन विधेयके आणली आहेत.

या विधेयकांमुळे पूर्ण भारतातील शेतकऱ्यांचे दिवस बदलणार आहेत. मात्र, शेतीतज्ज्ञ असलेले शरद पवार ज्यावेळी राज्यसभेमध्ये या विधेयकांवर चर्चा सुरू होती, त्यावेळी ते गायब होते.

मराठा आरक्षणासाठी का ते अजून आक्रमक झाले नाहीत? मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी अद्याप त्यांनी का अन्नत्याग केला नाही?, असा सवाल तावडे यांनी करत शरद पवारांचे अन्नत्याग म्हणजे खोटं रडणं आहे, असा टोला लगावला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment