कोरोनाच्या ‘ह्या’ मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक ; म्हणाल्या…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :-महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे. मुंबई , पुण्यात जास्त रुग्ण आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सरकार ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ अभियान राबविणार आहे. अहमदनगर जिल्ह्याने रुग्णसंख्येची 20 हजारी पार केली आहे.

जि. प. उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती प्रताप शेळके यांनी शुक्रवारी सकाळी आरोग्य समितीची आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव थांबवण्यासाठी नवीन मोहीम राबविली जाणार आहे. 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर दरम्यान ’माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविली जाणार आहे.

त्यानुसार कुटुंबांचे सर्वेक्षण करून लक्षणे असणारे रुग्ण शोधण्यासाठी जिल्ह्यात 1 हजार 755 टीम कार्यरत असणार आहेत. आरोग्य कर्मचार्‍यांमार्फत सर्वेक्षणादरम्यान मोबाईलवर उपलब्ध माहिती भरण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचार्‍यांवर आधीच्याच जबाबदार्‍यांचा बोजा लक्षात घेऊन

कोरोना प्रमाणे त्यांना ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या योजनेतून वगळण्याची मागणी जिल्हा अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचारी युनियनने निवेदनाद्वारे केली आहे. अध्यक्षा कॉ. मदिना शेख, सरचिटणीस कॉ. राजेंद्र बावके, सहचिटणीस कॉ. जीवन सुरडे यांनी नेवासा तहसीलदार,

गटविकास अधिकारी तसेच एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या प्रकल्प अधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले की, आरोग्य विभागाने11 सप्टेंबर रोजी परिपत्रक काढून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेबाबत स्पष्टीकरण केले आहे.

मार्गदर्शक पुस्तिकेत पथकामध्ये अंगणवाडी कार्यकर्ती (आवश्यकतेनुसार महिला व बालकल्याण विभागाची परवानगी घेऊन असा स्पष्ट उल्लेख केला आहे) या पथकाने दररोज 50 घरांना भेटी देऊन टेम्प्रेचर तपासणी, गरज पडल्यास इतर सुविधा देणे, घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रिकोविड, कोविड व पोस्ट कोविड यासंबंधी मार्गदर्शन करावयाचे आहे.

ही मोहीम दि.14 सप्टेंबर ते दि.24 ऑक्टोबर अशी तब्बल चाळीस दिवस चालणार आहे. मात्र, या कामाव्यतिरिक्त अंगणवाडी कर्मचार्‍यांना आहार वाटप, लसीकरण, वजने घेणे, गृहभेटी, 1 सप्टेंबरपासून दहा दिवस पोषण महिना साजरा करणे, परसबाग तयार करणे, आहार विषयक जनजागृती करणे, यांसह नियमितपणाने चालणारी कामे करावी लागत आहे.

त्यामुळे ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या मोहिमेत अंगणवाडी कर्मचार्‍यांना सामावून घेण्याची परवानगी महिला व बाल कल्याण विभागाने इतर विभागांना देऊ नये.

या योजनेसह एकात्मिक बाल विकास योजनेचे काम एकाचवेळी एकत्रितपणे करणे अशक्य बनले आहे. यापुढील काळात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत अंगणवाडी कर्मचारी सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment