आ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- मोदी सरकारने नुकतेच संसदेच्या दोन्ही सभागृहात कृषी विधेयक मंजूर केले. परंतु हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अनेक शेतकरी संघटना यविरोधात आक्रमक झाल्या आहेत.

यावरून महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी मोदी सरकारवर घणाघात केला होता. परंतु आता या सर्वांचा समाचार घेत आ. राधाकृष्ण विखे यांनी अस्तित्वासाठी काँग्रेसकडून कृषी धोरणाला विरोध होत असल्याची टीका करत कृषी धोरणाला विरोध करणार्‍या काँग्रेस पक्षाच्या सरकारनेच देशात प्रथम बाजार समित्यांसाठी मॉडेल अ‍ॅक्ट

आणला पण आता मात्र या नेत्यांना त्याचा सोयीस्कर विसर पडला आहे, मॉडेल अ‍ॅक्ट लागू केला तेव्हा कृषी मंत्री कोण होते हे हि सर्वाना माहित असल्याचा टोला त्यांनी लगावला. राहाता बाजारा समितीतील कार्यक्रमात आ. विखे बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या

नविन कृषी धोरणाचे स्वागत करून आ. विखे पाटील म्हणाले की, या धोरणामुळे कृषी व्यवसायाला स्वातंत्र्य मिळाले आहे. मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये अपेक्षित असलेल्या गोष्टींचा समावेश या धोरणात असल्याने कृषी व्यवसायात अमूलाग्र बदलांच्या क्रांतीची सुरूवात झाली आहे.

विरोधक केवळ आपल्या अस्तित्वासाठी या विधेयकाचे राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्रात डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान असतानाच या देशात मॉडेल अ‍ॅक्ट आणला गेला. त्यावेळी कृषी मंत्री कोण होते हे सर्वांनाच माहीत आहे. राज्यातही काँग्रेस आघाडीचे सरकार असताना वायदे बाजार,

ऑनलाईन ट्रेनिंग आणि खासगी बाजार समित्या सुरू करण्यास परवानगी दिली. केंद्र सरकारच्या नव्या कृषी धोरणात बाजार समित्यांचे अस्तित्व कायम राहणार असून या माध्यमातून स्पर्धा निर्माण होईल. योग्य भाव आणि पारदर्शक कारभारातून शेतकर्‍यांना आकर्षित करणारी व्यवस्था निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान , काही दिवसांपूर्वी महसूल मंत्री थोरात यांनी ‘पर्यावरण नियमांत बदल करून आदिवासींना जंगलाच्या बाहेर काढून नैसर्गिक साधनसंपत्ती उद्योगपती मित्रांना देण्याचा घाट अगोदरच घातला आहे आणि आता कृषी विधेयकं आणून शेतकर्‍यांना बड्या उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शेतकरी प्रेम बेगडी असून मोठ मोठ्या घोषणा आणि खोटी आश्वासने देण्यापलिकडे शेतकर्‍यांसाठी काहीही केले नाही. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आणि शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारीत दीडपट हमीभाव देण्याच्या घोषणा मोदींनी केल्या होत्या.

पण मोदींच्या काळात शेतकर्‍यांना त्यांच्या शेतीमालाचे योग्य मूल्यही मिळत नाही. या विधेयकामुळे शेतकर्‍यांना कवडीमोल दराने आपला माल विकावा लागणार आहे असा घाणाघात केला होता.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment