कोरोनामुळे शनिवारी आणखी १४ जणांचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनामुळे शनिवारी आणखी १४ जणांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ६७९ झाली आहे. शनिवारी दिवसभरात ७५६ पॉझिटिव्ह आढळून आले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत १६०, खाजगी प्रयोगशाळेत २३६ आणि अँटीजेन चाचणीत ३६० बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा हद्दीतील ६७, अकोले १७, जामखेड ८, कर्जत १, कोपरगाव २, नगर ग्रामीण १३, नेवासे ६, पारनेर १, पाथर्डी ७, शेवगाव ५, श्रीगोंदे १६, श्रीरामपूर ९,

कॅन्टोन्मेंट २ आणि मिलिटरी हॉस्पिटल ६ रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत मनपा ८७, अकोले ४, जामखेड ३, कर्जत ८, कोपरगाव ३, नगर ग्रामीण २४, नेवासे १५, पारनेर ७, पाथर्डी ९, राहाता १८, राहुरी १९, संगमनेर २, शेवगाव २, श्रीगोंदे २, श्रीरामपूर ३२ आणि मिलिटरी हॉस्पिटल १ रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत मनपा २६, अकोले १८, जामखेड २१, कर्जत १४, कोपरगाव २५, नगर ग्रामीण १८, नेवासे १६, पारनेर १७, पाथर्डी ३८, राहाता ३२, राहुरी ९, संगमनेर ५६, शेवगाव ३६, श्रीगोंदे १०, श्रीरामपूर २३ आणि कॅन्टोन्मेंट १ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात बळींची संख्या ६७९,

तर बाधितांची एकूण संख्या ४१ हजार ४०६ झाली आहे. शनिवारी ५१३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३६ हजार १५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.३२ टक्के झाले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment