थरारक! दोन बिबट्यांत घमासान;पुढे झाले ‘असे’ काही…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- सध्या मानवाने निसर्गावर केलेल्या अतिक्रमणाचा फटका मानवास नेहमीच बसताना दिसतो. प्राण्यांची अधिवास नष्ट केल्याने जंगली प्राण्यांनी मानवी वस्तीकडे आपला मोर्चा वळवला.

याची अनेक उदाहरणे आज आपण पाहतो. बिबट्यांची माणसांवर, जनावरांवर हल्ले केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.परंतु खानापूर शिवारात दोन बिबट्यांनी घासाच्या पिकात डरकाळ्या फोडत एकमेकांवर हल्ला चढवला.

त्यामुळे वस्तीवरील गाईगुरांसह माणसेही जागी झाली. एकच धावपळ उडाली. नागरिकांची चाहुल लागताच एक बिबट्या उसात पळाला तर दुसरा जबर जखमी झालेला बिबट्या शेतकर्‍याच्या शेडमध्ये आश्रयास आला.

ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. यामध्ये एका बिबट्याने दुसर्‍याच्या डोक्यावर पंजाचा जोरदार प्रहार केल्याने एक बिबट्या रक्तबंबाळ होऊन मेंदूला मार लागल्याने भोवळ येऊन जखमी झाला आहे.

शेडमध्ये स्थिरावलेल्या बिबट्याला पाहून अनेकांनी मदतीसाठी एकत्र आले. या घटनेची माहिती वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आली. सकाळी सदर बिबट्याला वनविभागाच्या अधिकार्‍यांच्या ताब्यात देण्यात आले.

अहमदनगर उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, सहवनसंरक्षक देवखिळे, वनक्षेत्रपाल पोकळे, यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल बी.एस.गाढे, बी.बी.सुरासे, एस.एम. लांडे, वनमित्र शरद आसने यांनी जखमी बिबट्यास उपचारासाठी श्रीरामपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment