चिंताजनक! कोरोनामधून बरे झालात? परंतु दिसू शकतात ‘ह्या’ आजाराची लक्षणं

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  सध्या जगभर कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अनेक बळी या आजाराने घेतले असून आर्थिक घडी विस्कटून लावली आहे. आज अनेक देश यावर लस शोधण्यासाठी कार्य करत आहेत. 

परंतु सध्या लस नसल्याने, संपर्ग टाळणे, मास्क, सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे आदी गोष्टी सर्वानी पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु ज्या प्रमाणे कोरोनाच्या लसीवर जसं संशोधन केलं जातं तसंच कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या परिस्थितीचाही अभ्यास केला जात आहे.

बऱ्या झालेल्या रुग्णांच्या अवस्थेला पोस्ट कोव्हिड फेज म्हणतात. अशा अवस्थेतील जे रुग्ण तपासणीला येत आहेत त्यांना विसराळूपणाचा त्रास होत आहे असं निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवलं आहे. या नव्या समस्येनं डोकं वर काढल्यामुळे चिंता वाढली आहे.

याबाबत दिल्लीतील राजीव गांधी सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलमधील डॉ. अजित जैन म्हणाले, ‘ कोरोनावर मात केलेल्या रुग्णांना विविध पद्धतीचे त्रास होत आहेत. पोस्ट कोविड क्लिनिकमध्ये आलेल्या 250 पैकी 80 जणांना मेंदू किंवा स्मरणशक्तीशी संबंधित अडचणी आहेत.

20 टक्के लोकांना सांगितलं की त्यांना विसराळूपणाचा त्रास होतो आहे. बरेचदा व्हायरस पेशींवर हल्ला करतात त्यामुळे त्या क्षीण होतात त्याचा परिणाम रुग्णाच्या मेंदूवर होतो आणि त्याला विसरभोळेपणाचा त्रास होतो. दिल्लीतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कोरोना होऊन गेला आणि अशी लक्षणं दिसली तरीही योग्य उपचार घेऊन विश्रांती घेणं हाच उपाय आहे.

वाढते कोरोनाचे संक्रमण पाहता जगभरात लोक लस येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तसे संशोधनही जगभर सुरु आहे. अद्याप रशियाने आपली लस लॉन्च केली आहे. तर भारतात तीन लशींचे उत्पादन प्रगतीपथावर आहे. यात  ‘सीरम इन्स्टिटयूट’, ‘झाइडसकॅडिला’ आणि ‘भारतबायोटेक’ या तीन कंपन्यांकडून कोरोनाची लस तयार करण्याचे काम सुरू आहे. यातील ‘सीरम इन्स्टिटयूट’ची लस लवकरच  येऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment