कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांमुळे बँक बंद!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाचे वाढते संक्रमण यामुळे अनेकदा गोष्टींना ब्रेक लागतो आहे.

लॉकडाऊन मध्ये शिथिलता येत असल्याने आता संक्रमणाचा वेग देखील वाढला आहे. दरम्यान जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील एका बॅंकचे कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने बँकेस टाळे ठोकण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, शेवगांव शहरातील मार्केट यार्ड समोरील सिंडिकेट या राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत एक कॅशियर, एक शिपाई आणि ब्रँच मॅनेजर असा एवढाच स्टाफ सध्या कार्यरत आहे.

दरम्यान या बँकेतील किती लोकांना कोरोना झाला याबाबत माहिती मिळाली नाही तरी देखील हि शाखा बेमुदत बंद करण्यात आली आहे. याबाबतचा बॉर्ड प्रवेशद्वारावर लावलेला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment