त्या प्रश्नाला रोहित पवारांनी दिले उत्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- जनमानसात आपली वेगळीच ओळख असलेले व कर्जत – जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे.

त्यांना राजकीय नेत्यांसह तरुणांकडून शुभेच्छा दिल्या जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वीच एक नेटकऱ्यांनं रोहित पवारांचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा करायचा का? असा प्रश्न विचारला होता.

दरम्यान तरुणाईचे मुख्य आकर्षण असलेले आ. रोहित पवार यांनी त्या प्रश्नाला खास आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. नेमके काय म्हणाले रोहित पवार?

जाणून घेऊ बेरोजगारी ही देशातील भीषण समस्या असून याकडं मीही वारंवार केंद्र सरकारचं लक्ष वेधलंय. वाढदिवसानिमित्त सामाजिक काम करण्याचं आवाहन मी केल्याने बेरोजगारी या सामाजिक प्रश्नावर तुम्ही आवाज उठवला,

तर मला आनंदच होईल. याबाबत तुमचे tweet retweet करुन युवांचा आवाज बनण्याचा मीही प्रयत्न करेन,” असं उत्तर रोहित पवारांनी दिलं.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment