धक्कादायक! मळणी मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- सोयाबीन मळणी यंञ्रामध्ये ओढल्या गेल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास राहाता शिवारातील न. पा. वाडी येथे घडली. 

अशोक कोंडाजी पोकळे, वय ३५ असे मत झालेल्या तरुणाचे नाव आहे. अशोक हे आपल्या चार भावांसोबत मळणी यंत्रातून सोयाबीन काढणीचे काम करत होते.

अशोक यांनी हाताला बांधलेल्या कापड मशीन मध्ये ओढला जाऊन डोक्यापासून कंबरेपर्यंत शरीराचा अक्षरशः चेंदा चेंदा होऊन अशोक पोकळे जागेवरच मयत झाला.

तातडीने त्याला मशीन बंद करून बाहेर काढण्यात आले. या घटनेने परीसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.सदर घटनेची माहिती तातडीने राहता पोलीसांना कळविण्यात आली पोलिसांनी घटना स्थळी येत पंचनामा केला.

याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अशीच एक घटना मागील काही दिवसापूर्वी राहुरी तालुक्यात घडली होती या मध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment