सुशांतसिंहची हत्या ? एम्सचा अहवाल सीबीआयकडे सादर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरात आत्महत्या केली. त्यानंतर या प्रकरणात अनेक वळणे आली. पोलिसांनी अनेकांची चौकशी केली.

परंतु आत्महत्येचे नेमके कारण समोर आले नाही. आता हा तपास CBI, NCB, ईडी, या तीन संस्था तपास करत आहेत. परंतु मध्यंतरी सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण आता सीबीआयसाठी महत्त्वाचे राहिले नाही,

असा आरोप सुशांतसिंह राजपूत याच्या कुटुंबीयांचे वकील विकास सिंह यांनी केला होता. पण आता एम्सचा अहवाल सीबीआयकडे सादर करण्यात आला आहे.

यानंतर सीबीआयकडून पुन्हा एकदा तपास सुरू होईल आणि अभिनेत्याच्या मृत्यूशी संबंधित अनेक रहस्ये उघडकीस येतील.

एम्सच्या अहवालावर सीबीआय अंतिम निर्णय घेईल. सुशांतसिंह राजपूतची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली? पुराव्यांच्या आधारावर सीबीआय निर्णयावर घेईल.

ऑटोप्सी आणि व्हिसेराचा तपास अहवाल सीबीआयला सोपवण्यात आला आहे. सीबीआय या अहवालाची अन्य पुराव्यांशी तुलना करेल. अहवालाच्या आधारे सीबीआय आपला पुढील तपास करेल.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment