कोणता मास्क वापरावा? का व कसा वापरावा? ; जाणून घ्या…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अनेक बळी या आजाराने घेतले असून आर्थिक घडी विस्कटून लावली आहे. आज अनेक देश यावर लस शोधण्यासाठी कार्य करत आहेत.

परंतु सध्या लस नसल्याने, संपर्ग टाळणे, मास्क, सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे आदी गोष्टी सर्वानी पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यात मास्क वापराने तर खरोखर गरजेचे आहे. परंतु आता मास्क केवळ तुमचे रक्षणच नाही करणार तर ते घालून रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकतो असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

काही लोक कापडी, काही सर्जिकल तर काही N95 मास्कचा (mask) वापर करत आहे. मात्र यापैकी कोणता मास्क प्रभावी आहे, असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. याबाबत संशोधन झालं आणि त्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार कमी करण्यासाठी N95 मास्क सर्वांत प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे.

मास्कबाबत कॅलिफोर्निया विद्यापीठात अभ्यास करण्यात आला. Medical Xpress मध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. खोकला आणि शिंकेतून बाहेर पडणाऱ्या संसर्गजन्य शिंतोड्यांमुळे हवेत विषाणूचा प्रसार होण्याचा धोका जास्त आहे आणि अशा पद्धतीने संसर्ग पसरण्याचा धोका कमी करण्यासाठी सर्जिकल मास्क

आणि N95 मास्क जास्त प्रभावी आहे. N95 घातल्यानंतर शिंक आणि खोकल्यावाटे संसर्ग पसरण्याचा धोका 10 पटींनी कमी होतो. दरम्यान, मास्क केवळ तुमचे रक्षणच नाही करणार तर ते घालून रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकतो असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. म्हणजेच मास्क लशीसारखं काम करतो,

असं संशोधन एका मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालं आहे. न्यू इंग्लड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये हे गृहितक मांडण्यात आलं आहे. त्यानुसार प्रतिकारशक्तीबाबत सिद्धता नसली तरी सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क घातल्यामुळे विषाणूचा प्रभाव कमी होतो. मास्कमुळे कोरोनाबाधिक व्यक्तीच्या संसर्गजन्य ड्रॉपलेट्सपासून संरक्षण मिळतं.

शिंकताना, खोकताना हे ड्रॉपलेट्स बाहेर उडतात, तेव्हा हजारो विषाणू त्या ड्रॉपलेट्समध्ये असतात. त्यातलाच एखादा तुमच्या शरीरार गेला तर Covid-19 चा संसर्ग होतो. त्यामुळे मास्कने विषाणूचा प्रभाव कमी होते हे गृहितक सत्य निघाल्यास मास्क हे एका लशीसारखं काम करतील.

मास्क हा फक्त विषाणूपासून बचावच करत नाही तर रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढवण्यात मदत करतो, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिकलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment