प्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-  प्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी. मात्र गंगा उद्यानासह शहरातील अन्य सर्व ठिकाणच्या गोरगरिबांना मनपाने फेरीवाला धोरण निश्चित करे पर्यंत अतिक्रमण विभागाने कारवाई करू नये, अशी मागणी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मनपा अतिक्रमण विभाग प्रमुख सुरेश इथापे यांच्याकडे केली आहे.

कॉंग्रेस पक्षानेच सर्वात आधी या विक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय योग्य प्रकारे होईल अशी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी मनापा आयुक्तांना धारेवर धरत महानगर पालिकेत भाजी, फळ विक्रेत्यांसह केली होती. मनपाने यात राजकारण केले हे दुर्दैवी आहे.

श्रेय कुणीही लाटा पण यांच्यावरील अन्याय थांबवा, हीच कॉंग्रेसची पहिल्या पासूनची भूमिका राहिलेली आहे. यांचा पुनरूच्चार काळे यांनी केला आहे. कॉंग्रेस पक्ष शहरातील भाजी विक्रेते, टपरीधारक, पथारीवाले या गोरगरीब सामान्य नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.

ज्या-ज्या वेळी या घटकांवर अन्याय होईल त्या-त्या वेळी कॉंग्रेस तात्काळ धावून येईल. त्यामुळे त्यांनी चिंता करू नये. कॉंग्रेस हा पक्षच मुळात सामन्यांच्या हक्कासाठी लढणारा पक्ष आहे, असे काळे यांनी म्हटले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार जो पर्यंत महानगर पालिका फेरीवाला धोरण निश्चित करून त्याची अंमलबजावणी करीत नाही तो पर्यंत भाजी विक्रेते,

टपरीधारक, पथारीवाले यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याचा मनपाला अधिकार नाही याची मनपाने जाणीव ठेवावी, असा सल्ला काळे यांनी मनपाला दिला आहे.

मनपाचा बुलडोझर आला तर माझ्याशी संपर्क साधा :-भाजी विक्रेते, टपरीधारक, पथारीवाले यांनी मनपाचा अतिक्रमण विभागा ट्रक, बुलडोझर घेऊन आला तर माझ्याशी ९०२८७२५३६८ या माझ्या वैयक्तिक क्रमांकावर संपर्क साधावा. कॉंग्रेस तात्काळ आपल्या मदतीला धावून येईल.

मनपाने आधी फेरीवाला धोरण निश्चित करावे. बेकायदेशीर कारवाई करीत कायदा हातात घेऊ नये. गोरगरिबांनी मनपाने अन्यायकारकरित्या लावलेला दंड देऊ नये, असे आव्हान काळे यांनी गोरगरीब व्यावसायिकांना केले आहे. अशा प्रकारे बेकायदेशीर दंड वसूल करण्याचा मनपाला अधिकार नसल्याचे काळे यांनी म्हटले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment