भाजपाची जिल्हाकार्यकारिणी सदस्यांची यादी जाहीर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-  राज्यासह जिल्हापातळीवर राजकीय पक्षांकडून पक्ष बळकटीकरणासाठी धोरणात्मक निर्णय घेतले जाऊ लागले आहे. पक्षातील कार्यकर्त्यांना कामाच्या जाबाबदाऱ्या निश्चित करून देण्यात येत आहे.

नुकताच भारतीय जनता पक्षाची जिल्हा कार्यकारीणी सदस्य व नव्या पदाधिका-यांची निवड करण्यात आली आहे. भाजपच्या जिल्हा कार्यकारीणीत कायम निमंत्रित सदस्यपदी शाम जाजू, माजी मंत्री मधुकर पिचड,

माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, अ‍ॅड.रविकाका बोरावके, माजी आमदार बाळासाहेब मुरकूटे, आमदार वैभव पिचड, सिताराम गायकर, हेरंब औटी,

उदयसिंह चंदेल,विठ्ठलराव लंघे, राजेश चौधरी व राहात्याच्या नगराध्यक्ष ममता पिपाडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी दिली.

पक्षाच्या नूतन जिल्हा कार्यकारीणीतील सदस्य पुढील प्रमाणे, शरद थोरात(कोपरगाव), अ‍ॅड.रघुनाथ बोठे (राहाता), अशोक पवार (शिर्डी), नितीन कापसे (राहाता), सुधाकर गुंजाळ (संगमनेर), गणेश राठी (संगमनेर),

सतीश सौदागर (श्रीरामपूर), सचिन देसरडा (नेवासा), सुदाम सानप (संगमनेर) या सर्वांची उपाध्यक्षपदी तर नितीन दिनकर (नेवासे), जालिंदर वाकचौरे (अकोले), सुनिल वाणी (श्रीरामपूर) यांची सरचिटणीपदी नियुक्ती करण्यात आली.

महिला, युवा, अनुसुचित जाती, अदिवासी, अल्पसंख्यांक, किसान व इतर मागासवर्गीय मोर्चाच्या अध्यक्षपदी अनुक्रमे, सोनाली नाईकवाडे (संगमनेर), श्रीराज डेरे (संगमनेर), विनोद राक्षे (कोपरगाव), विजय भांगरे (अकोले),

असिफखान पठाण (संगमनेर), सतीश कानवडे (संगमनेर), बाळासाहेब गाडेकर(राहाता) यांची नियुक्ती करण्यात आली. दत्तात्रय काले( कोपरगाव शहर अध्यक्ष), अ‍ॅड.श्रीराम गणपूले( संगमनेर शहर अध्यक्ष),

ज्ञानेश्वर गोंदकर (राहाता तालुका अध्यक्ष), सचिन शिंदे (शिर्डी शहर अध्यक्ष), मारूती बिंगले (श्रीरामपुर शहर अध्यक्ष), बबन मुठे(श्रीरामपूर तालुका अध्यक्ष) यांची नियुक्ती करण्यात आली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment