ड्रेनेजलाईनचा प्रश्‍न सुटला, नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचे आभार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-  काटवन खंडोबा रोड येथील अनेक दिवसापासून प्रलंबीत असलेला गाझीनगरच्या ड्रेनेजलाईनचा प्रश्‍न आखेर आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याने सुटला.

महापालिका कर्मचार्‍यांनी ड्रेनेजलाईन दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने या परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. गाझीनगर भागातील ड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते.

तर या भागात दुर्गंधी व घाण पाणी वर आल्याने साथीचे आजार पसरण्यास सुरुवात झाली होती. नागरिकांना घरात थांबणे देखील कठिण झाले असताना स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासन व नगरसेवकांचे लक्ष वेधले होते.

नागरिकांनी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेतली न गेल्याने स्थानिक नागरिकांनी आमदार संग्राम जगताप यांची भेट घेऊन सदर प्रश्‍न मार्गी लावण्याचे निवेदन दिले होते.

आमदार जगताप यांनी नागरिकांना सदर प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन देऊन, सदर प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी त्यांनी महापालिकेतील अधिकार्‍यांना फोनवर खडसावले.

निवेदन दिल्याच्या दुसर्‍याच दिवशी मंगळवार दि.29 सप्टेंबर पासून ड्रेनेजलाईन दुरुतीचे काम महापालिकेतील कर्मचार्‍यांनी हाती घेतले आहे. दुसर्‍या दिवशी बुधवारीही सदर काम सुरु होते.

नागरिकांच्या प्रश्‍नांची तातडीने दखल घेऊन सदर प्रश्‍न मार्गी लावल्याबद्दल आशा गायकवाड, हसीना शेख, समिना शेख, आयेशा बागवान, रेशमा बागवान, मनिषा शिंदे,

हाजराबी शेख, नारायण दातरंगे, वसिम शेख, खलिल शेख, नजीर पठाण, शाहीन शेख, फरीदा शेख आदिंसह परिसरातील नागरिकांनी आमदार जगताप यांचे आभार मानले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment