रस्त्याची झालीय ‘अशी’ दुरवस्था ; मग तरुणांनी केलंय ‘असे’ काही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- सध्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. परंतु, लोकप्रतिनिधींसह प्रशासनही याकडे कानाडोळा करत आहे. यामध्ये वांबोरी-डोंगरगण-नगर रस्त्याची दुरवस्था झाली असून, संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे.

तर रस्त्यात तीन ते चार फुटांपर्यंतचे खड्डे आहेत. वांबोरी शहरात मोठी बाजारपेठ असल्याने कायमच या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. तसेच परिसरात केएसबी कंपनी, प्रसाद शुगर कारखाना, बाजार समिती यांची वाहतूकही याच रस्त्याने असते. परिसरातील पिंपळगाव, आढाववाडी,

डोंगरगण, मांजरसुंभा, पाची महादेव या गावातील नागरिकांना वांबोरी व राहुरीला जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. कुक्कडवेढे, खडांबे खुर्द, खडांबे बुद्रुक, गुंजाळे, कात्रड, चेडगाव, उंबरे, ब्राह्मणी या गावांना अहमदनगरला जाण्यासाठी हा जवळचा रस्ता आहे.

त्यामुळे या रस्त्याने रोज शेकडो वाहने धावतात. दरम्यान, याबाबत अनेकदा तक्रारी करूनही संबंधित अधिकारी व राजकीय नेत्यांनी याकडे सपशेल डोळेझाक केली आहे. त्यामुळे संबंधितांना जागे करण्यासाठी वांबोरी तील तरुणांनी या रस्त्यातील खड्ड्यांना रांगोळी काढून त्यात वृक्षारोपण करून अनोखे आंदोलन केले.

तसेच याकडे तात्काळ लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते विष्णू ढवळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनातून दिला आहे. या आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन रस्त्याची डागडुजी करून लवकरात लवकर संपूर्ण रस्त्यावर डांबरीकरणाचा थर देऊन रस्ता तयार केला

नाही तर राहुरीचे सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय व अहमदनगर जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय येथे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ढवळे यांनी निवेदनातून दिला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment