खासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही. जनता माझे कुटुंब असल्याने त्यांची व्यवस्था करणे ही माझी जबाबदारी आहे, हे लक्षात ठेवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार डाॅ. सुजय विखे यांनी बुधवारी केले.

पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त राहुरी विवेकानंद नर्सिंग होम व शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने राहुरी काॅलेज येथील मुलींच्या वसतिगृहात सुरू

करण्यात आलेल्या सर्व सुविधांयुक्त शंभर बेडचे कोविड केअर सेंटरच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार शिवाजी कर्डिले होते.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून अनेक ठिकाणी लॉकडाऊनची मागणी केली होती.

मात्र, काही शासकीय अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणाच्या भूमिका नडल्याचे विखे म्हणाले. कोरोनाची परिस्थिती बिघडली असताना शासनाला गांभीर्य नाही.

नर्सिंग होम व शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील व आसपासच्या नागरिकांना कोविड सेंटर सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी कर्डिले यांनी केली होती.

तत्काळ बैठक घेऊन १०० बेडचे सुविधायुक्त कोवड सेंटर उपलब्ध करण्यात आल्याची माहिती सुजय विखे यांनी दिली. कर्डिले म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढल्याने उपचारांसाठी अनेक ठिकाणी बेड उपलब्ध होत नाहीत.

ही काळाची गरज ओळखून राहुरी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात यावे, यासाठी खासदार विखे यांच्याबरोबर चर्चा केल्याने राहुरी काॅलेज येथे सुसज्ज केअर सेंटर उभे राहिले आहे. अशा केअर सेंटरची व्यवस्था जिल्ह्यात कोठेही नाही.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment