आता ‘ह्या’ अधिकाऱ्यांना शाळा भेट सक्तीची; करावे लागणार ‘हे’ काम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- शाळेच्या दर्जा आणि गुणवत्ता वाढीसाठी आजतागायत शासनाच्या वतीने अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. आता याच अनुशंघाने एक नवीन धोरण राबविले जाणार आहे.

यानुसार राज्यातील महसूल व ग्रामविकास विभागातील वर्ग एक व दोन श्रेणीतील अधिकार्‍यांना दरमहा शाळा भेटी करण्याची सक्ती करण्यात आली आहे. दरवार्षिक किमान तीन शाळा भेटी कराव्यात असा आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

काय आहे नियोजन? :-अधिकार्‍यांनी शाळा भेटी दरम्यान शाळांच्या स्थिती संदर्भात आपली निरीक्षणे नोंदवायची आहेत. शाळा भेटी दरम्यान स्थानिक पातळीवर सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती यांच्याशी सुसंवाद करून शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे, विद्यार्थ्यांचा पट वाढवण्यासाठी प्रयत्न करता यावेत यासाठी मार्गदर्शन करावयाचे आहे.

त्याच्यासोबत 100 गुणांचे मूल्यमापन करणे अनिवार्य करण्यात आली असून चालू अभ्यासक्रमावर आधारित कोणत्याही एका घटकाचे अध्यापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी विभागीय स्तरावर विभागीय महसूल अधिकारी यांनी यासंदर्भात संनियंत्रण करावयाचे आहे.

असे होईल मूल्यमापन :- भेट देणार्‍या अधिकार्‍यांनी शाळा भेटीदरम्यान 100 गुणांचे मूल्यमापन करावयाची असून त्यात मुलामुलींचे स्वच्छतागृह, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, संरक्षक भिंत, खेळाचे मैदान, विद्युत पुरवठा, प्रथमोपचार पेटी, अग्निशमन यंत्र, संगणक सुविधा, विविध विषयांच्या उपलब्ध असलेल्या शैक्षणिक साहित्य साठीच्या पेट्या,

शालेय पोषण आहार योजनेचे अभिलेख, त्यासंबंधी स्वच्छता, आहाराचा दर्जा, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता असताना संख्या व संख्याज्ञानावरील क्रिया, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, सामान्य ज्ञानाचे प्रश्न, उत्तरे लोकसहभाग, शाळा व्यवस्थापन संबंधीच्या बैठका आदि बाबी तपासल्या जाणार आहेत.

कोण करेल नियंत्रण :- जिल्ह्यात जिल्हाधिकारी सनियंत्रण करतील. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अधिनस्त असलेले गट विकास अधिकारी विविध विभागांचे प्रमुख यांनी शाळा भेटी करण्याच्या दृष्टीने नियोजन करावयाचे आहेत तर महसूल विभागाने आपल्या हाती असलेले जिल्हाधिकारी, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी यांनी शाळा भेटी करावयाच्या आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment