मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून अजित पवारांचे सुपुत्र काय म्हणाले पहा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले आहे. विरोधक सत्ताधारी यांच्यामध्ये आरोप – प्रत्यारोप सुरु असून मात्र अद्याप काही तोडगा निघालेला नाही आहे.

दरम्यान आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. बीड जिल्ह्यातील विवेक कल्याण रहाडे या 18 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

मराठा आरक्षणसाठी विवेकने आत्महत्या केल्याचा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. यापार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी ट्विट करीत विवेकच्या दुर्दैवी मृत्युचा दाखला देत

मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे. ‘ मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या विवेकची बातमी ऐकून धक्का बसला.

अशा दुर्दैवी घटनांची साखळी सुरु होण्यापूर्वी मराठा नेत्यांना जागं व्हावं लागेल आणि त्यासाठी संघर्ष करावा लागेल. हे संकट सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पावलं उचलायला हवी.

मी मराठा आंदोलनाची ज्वलंत मशाल घेण्यास तयार आहे. विवेक आणि इतर कोट्यवधी असहाय्य ’विवेक’साठी न्यायाचं दार ठोठावण्यासाठी तयार आहे.अशी भूमिका पवार यांनी भूमिका मांडली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment