पोपटराव पवार म्हणाले कोरोनाबाबतचा वाढता निष्काळजीपणा जीवघेणा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- शासनाने ठरवून दिलेले नियम काटेकोरपणे पाळले, तरच आपण कोरोनावर यशस्वी मात करू शकतो. मात्र, सध्या अनेकांकडून निष्काळजीपणा वाढत आहे.

त्याचे परिणाम वाढत्या रुग्णसंख्येवरून दिसून येत आहेत. निष्काळजीपणा जीवघेणा ठरत आहे, अशी खंत सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांनी व्यक्त केली.

नगर व पारनेर तालुका पत्रकार संघ आणि हिवरेबाजार ग्रामस्थांच्या वतीने गावात कोरोना जनजागृती अभियान राबवण्यात आले. पारनेर येथील सफर आडवाटेची ग्रूपने पथनाट्य सादर केले.

या पथनाट्यात ओमप्रकाश देंडगे, प्रा. तुषार ठुबे, शाहीर दत्ता जाधव, अशोक गायकवाड, सोमनाथ चौधरी, संकेत ठाणगे, समाधान रणशूर,

ऋषिकेश माने, वैभव गंधे, उत्कर्ष झावरे, श्रद्धा ढवण, आरती बेलोटे, माधुरी चत्तर, विनोद ठुबे, गणेश लवांदे होते. प्राथमिक आरोग्य केंद्राने गावकऱ्यांची कोरोना चाचणी घेतली असून सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment