विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी ५०० लोकांना परवानगी द्यावी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  मंगल कार्यालयातील विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी ५०० लोकांना परवानगी द्यावी, महानगर पालिकेने सर्व कर माफ करावे, बँकांनी कर्जाचे हप्ते भरण्यास मुदतवाढ द्यावी तसेच वीज मंडळाने कोरोना काळातील वीज बिल माफ करावे,

अशा मागण्यांचे निवेदन मंगल कार्यालय चालक, मंडप, डेकोरेटर्स, केटरिंग, बँड संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मेल द्वारे पाठविण्यात येणार असल्याची माहिती विविध असोसिएशनच्या वतीने देण्यात आली.

आपल्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वेळ घेऊन या मागण्या त्यांच्या समोर प्रत्यक्ष पणे किंवा व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे मांडण्यात येणार आहेत असे माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी जाहीर केले. येथील कोहिनुर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या

बैठकीत मंगल कार्यालय चालक, केटरर्स, मंडप व लाईट डेकोरेटर्स, फ्लॉवर डेकोरेटर्स, बँड, गेट पॅकेज, घोडा, बग्गी, सनई चौघडा अशा विविध असोसिएशनचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. नियम अटी पालन करण्याची दिली हमी मंगल कार्यालय चालक व विवाह सोहळ्याशी संबंधित सर्व यंत्रणा सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझर चा वापर करणे,

टेम्प्रेचर चेक करणे, मास्क चा वापर करणे, अशा कोव्हीड शी संबंधित सर्व नियम व अटींचे पालन करून मंगल कार्यालये चालविणार असल्याची लेखी हमी देत आहे. तरी शासनाने या मागण्यांचा विचार करावा. अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या निर्णयानुसार २०० लोकांना,

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार १०० लोकांना तर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ५० लोकांना विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यास लेखी परवानगी आहे मात्र केंद्राच्या निर्णयाची अंमलबजावणी राज्यात होत नाही. त्यामुळे मंगल कार्यालये चालक व संबधीत अधिकारी यांच्यामध्येच या परवानगी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

हा संभ्रम देखील दूर झाला पाहिजे. व तसा सुधारित शासन निर्णय शासनाने जारी करावा. अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे. या मागण्या मान्य न झाल्यास जानेवारी पासून मंगल कार्यालये चालक पुढील बुकिंगवर पूर्णपणे बहिष्कार टाकणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment