राहुल गांधींसाठी त्यांनी रस्ता रोखला…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  उत्तरप्रदेशमधील हाथरास घटनेने देशभर संतापाची लाट उसळली आहे. पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जाणाऱ्या राहायला गांधींना पोलिसांनी रोखले, धक्काबुक्की केली, याचे पडसाद देशभर उमटले.

याच पार्श्वभूमीवर संगमेनर तालुक्यात रास्तारोको करण्यात आला. उत्तर प्रदेशातील हाथरस येथील अत्याचाराच्या घटनेचा संगमनेरातील सर्व दलित समाजाच्या वतीने मोर्चा काढून निषेध नोंदवण्यात आला.

तसेच संगमनेर बसस्थानकासमोर काही वेळ रस्तारोको आंदोलन करण्यात आले. हाथरस येथील दलित कन्येवर झालेला अत्याचार व तिची हत्या योगी सरकारची मानसिकता स्पष्ट करते आहे.

या अन्यायाविरोधात भारतीय म्हणून तरी रस्त्यावर या अन्यथा, अशा असंख्य निर्भया वासनांधांच्या शिकार होत राहतील, अशा कठोर शब्दात काजल निळे या युवतीने तिचे विचार प्रकट केले.

दलितांवर अत्याचार करणे हा जन्मसिध्द हक्क असल्याची वृत्ती समाजात फोफावत आहे. या घटनेत उत्तर प्रदेशातील पोलिस व न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

देश हुकूमशाहीच्या दिशेने जात असून, खासदार राहुल गांधींना दिलेला धक्का त्यांना नाही तर लोकशाहीला दिला होता, अशी बोचरी टीका निळे हिने केली.

उत्तर प्रदेशातील या निर्घृण घटनेत आरोपींना पाठीशी घालणारे पोलिस व सनदी अधिकाऱ्यांना सहआरोपी करुन सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपाईच्या वतीने करण्यात येत आहे.

या वेळी रिपाईचे आठवले व गवई गट, दलित पँथर, मातंग आघाडी, वाल्मिकी संघटना व गणराज्य संघटनेसह छात्रभारती व मराठा संघटनांचे प्रतिनिधी मोर्चासाठी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बसस्थानक या दरम्यान फेरी काढून बसस्थानकावर निषेधसभा घेण्यात आली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment