वाळू तस्करी रोखण्यासाठी ग्रामस्थांनी केले ‘असे’ काही; चढले सरणावर आणि …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-सध्या वाळू तस्करी, अवैध मुरूम उत्खनन आदी अवैध प्रकार जिल्ह्यात सर्वत्र सुरु असल्याचे वास्तव आहे. पोलीस, महसूल प्रशासन यावर कडक कारवाई करताना दिसून येतात.

परंतु या लोकनावर मात्र जरब बसताना दिसत नाही. प्रवरा नदीपात्रातून अवैधरित्या रोज हजारो ब्रास मुरूम उचलला जात आहे. यावर कारवाई करावी यास आळा घालावा यासाठी परिसरातील ग्रामस्थ नेहमीच आक्रमक होताना दिसतात. परंतु महात्मा गांधीजींच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रामस्थांनी अनोखे आंदोलन केले.

‘हे राम’ म्हणत स्मशानभूमीतच सरण रचून त्यावर बसून राहुरी तालुक्यातील धानोरे येथील ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले. धानोरे येथील ग्रामस्थांच्या आंदोलनाकडे जिल्हा प्रशासनातील जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी पाठ फिरविली असल्याने आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

जोपर्यंत या वाळूचोरी प्रकरणातील दोषी महसूलच्या अधिकारी व कर्मचार्‍यांवर ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत स्मशानातील बेमुदत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. प्रवरा नदीपात्रातून गेल्या काही वर्षांपासून खुलेआम अनधिकृत वाळू उपसा होत असताना

महसूल प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने धानोरे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. सामाजिक कार्यकर्ते सूर्यभान दिघे आणि आदिनाथ दिघे यांनी महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी हे राम म्हणत स्मशानात लाकडे व सरपण रचून त्यावरच आमरण उपोषण सुरू केले आहे.

दोषी अधिकारी व वाळू तस्करांना पाठीशी घालण्याचे काम महसूलचे अधिकारी करीत असल्याने आम्ही न्यायासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत दोषींवर ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत आमचा लढ़ा सुरूच राहील असे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

दरम्यान, नुकतेच देवळाली प्रवरा व राहुरी कारखाना परिसरातून अवैधरित्या रोज हजारो ब्रास मुरूम उचलला जात आहे. या मुरूम माफीयांवर आठ दिवसांत कारवाई करा अन्यथा राहुरी तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देवळाली प्रवरा शिवसेना शहराध्यक्ष सुनील कराळे यांनी निवेदनाद्वारे दिला होता.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment